मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटर बनला बापमाणूस, सोशल मीडियावर चिमुकल्या पाहुणीचा फोटो केला शेअर
न्यूझीलंडचा निपुण वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्क्लेनाघन आणि त्याची पत्नी जॉर्जिया यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. मॅक्क्लेनाघनने गेल्या आठवड्यात त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून इन्स्टाग्रामवर एक छोटीशी क्लिप शेअर करून ही बातमी शेअर केली होती. मंगळवारी, मॅक्क्लेनाघनने त्यांच्या मुलीचा एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून बाळाचे नाव उघड केले.
न्यूझीलंडचा (New Zealand) निपुण वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्क्लेनाघन (Mitchell McClenaghan) आणि त्याची पत्नी जॉर्जिया (Georgia) यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. त्यांच्या मुलीचा जन्म 23 ऑगस्ट रोजी झाला. त्याची पत्नी आणि मुलगी ठीक आहेत असेही मॅक्लेनाघनने सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)