IPL Auction 2025 Live

Mihir Diwakar Was Taken in Custody: एमएस धोनीचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकरला अटक; क्रिकेटपटूने दाखल केला होता फसवणुकीचा गुन्हा

जयपूरमध्ये क्रिकेट अकादमीच्या स्थापनेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा अनधिकृत वापर केल्याच्या आरोपावरून जयपूर पोलिसांनी मिहिर दिवाकरला ताब्यात घेतले आहे.

Mihir Diwakar Was Taken in Custody: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा माजी व्यावसायिक भागीदार मिहीर दिवाकर याला फसवणुकीच्या आरोपाखाली मंगळवारी अटक करण्यात आली. याबाबत स्वतः धोनीने फौजदारी खटला दाखल केला होता. आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात, रांचीच्या जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या कामापानीमध्ये सौम्या दाससह दिवाकर संचालक होते. जयपूरमध्ये क्रिकेट अकादमीच्या स्थापनेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा अनधिकृत वापर केल्याच्या आरोपावरून जयपूर पोलिसांनी मिहिर दिवाकरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी 406, 420, 467, 468, 471 आणि 120B कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूरच्या क्रिकेट अकादमीसाठी आपले नाव वापरण्याची परवानगी धोनीने काढून घेतली होती, मात्र तरी दिवाकरने धोनीच्या नावाने अकादमीसाठी निधी गोळा केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा: Pune Online Fraud Crime: अवघ्या 514 रुपयांचे गॅस बिल भरण्याच्या नावाखाली वृद्धाची 16 लाखांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)