MI vs SRH IPL 2024 Live Score Update: मुंबई इंडियन्ससमोर हैदराबादचे 174 धावांचे आव्हान, हार्दिक-चावलाची शानदार गोलंदाजी
आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर कमिन्स यानं हैदराबादी धावसंख्या वाढवली. कमिन्स यानं अखेरीस 205 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. कमिन्सने दोन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावा केल्या.
हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी आज भेदक मारा केला. पांड्यानं 4 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर पियुष चावला यानं 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. चावलाने क्लासेन, हेड आणि समद यांना तंबूत पाठवले. तर हार्दिक पांड्याने नितीश रेड्डी, अब्दुल समद आणि मार्को यान्सन यांना बाद केले. जसप्रीत बुमराहने 23 धावांच्या मोबदल्या एक विकेट घेतली. मुंबईच्या गोंलदाजाच्या शानदार कामगिरीमुळे हैदराबादला 173 धावांवर रोखता आले. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स यानं शानदार फलंदाज केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर कमिन्स यानं हैदराबादी धावसंख्या वाढवली. कमिन्स यानं अखेरीस 205 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. कमिन्सने दोन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावा केल्या.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)