MI IPL 2022: मुंबई इंडियन्सचे सर्व दिग्गज फ्लॉप, ‘Arjun Tendulkar याला संघात आणण्याची हीच वेळ’; MI च्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या मागणीने धरला जोर
भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, शनिवारी, 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातुन आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. मुंबईने एका सराव सत्रात अष्टपैलू खेळाडूचा एक फोटो शेअर केला, ज्याने आता या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्याची मागणी चाहत्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), शनिवारी, 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यातुन आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण करू शकतो. युवा अष्टपैलू खेळाडू आता काही काळापासून फ्रँचायझी सोबत आहे आणि पाच वेळा चॅम्पियनने फेब्रुवारीमध्ये आयपीएल 2022 मेगा लिलावात त्याला पुन्हा खरेदी केली आहे. मुंबईने एका सराव सत्रात अष्टपैलू खेळाडूचा एक फोटो शेअर केला, ज्याने नेटकऱ्यांमध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळेल का? अशी चर्चा रंगली आहे.
ज्युनियर तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करेल की नाही याबद्दल नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत:
आता पदार्पणाची वेळ आली आहे!
पदार्पण लोड होत आहे....
मी आतुरतेने वाट पाहत आहे
अर्जुनला एक्सपोजर मिळण्याची हीच योग्य वेळ!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)