Mauka Mauka AD 2023: या विश्वचषकाच्या वेळी पुन्हा दिसणार मौका मौका जाहिरात, IND VS PAK सामन्यासाठीचा स्टार स्पोर्टचा नवा व्हिडिओ समोर
वर्ल्ड कपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध 'मौका मौका' टीव्ही जाहिरात मोहीम परत आणली आहे.
या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक 2023 ला अवघे काही दिवस उरले आहेत. क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बहुप्रतिक्षित संघर्षांपैकी एक, कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (हेही वाचा - All Squads for ICC Cricket World Cup 2023: अखेर आयसीसी विश्वचषकासाठी सर्व दहा संघ जाहीर, एका क्लिकवर पहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी)
दरम्यान, वर्ल्ड कपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध 'मौका मौका' टीव्ही जाहिरात मोहीम परत आणली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विशाल मल्होत्रा पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची जर्सी परिधान करत आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि शहनाज कौर गिल देखील आहेत.
पाहा व्हिडिओ -
Hum sab #8KaWait kar rahe hain! 👀
Will #India make it 8-0 in the #GreatestRivalry & take a step closer to the #GreatestGlory 🏆
Tune-in to #INDvPAK at #WorldCupOnStar
SAT, OCT 14, 12:30 PM onwards | Star Sports Network#CWC23 #BestVsBest #WorldCupKaBhootSawaar #Cricket pic.twitter.com/RIFgwLxXeH
— Star Sports (@StarSportsIndia) September 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2023 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

