IPL 2023: मॅथ्यू शॉर्ट पंजाब किंग्जमध्ये सामील; संदीप शर्मा राजस्थानच्या टिममध्ये रॉयल एँट्री
बिग बॅश लीगच्या यावेळीच्या हंगामात शॉर्टने 458 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या.
पंजाब किंग्जने जॉनी बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅथ्यू शॉर्टला (Matthew Short) करारबद्ध केले आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज TATA IPL 2023 मधून बाहेर पडला आहे कारण तो सप्टेंबरमध्ये झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झाला नाही. हा शॉर्टचा पहिला आयपीएल हंगाम असेल. बिग बॅश लीगच्या यावेळीच्या हंगामात शॉर्टने 458 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या. यावेळी त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात देखील आले. वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma ) या मोसमात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करणार असून प्रसिध कृष्णाच्या जागी त्याला करारबद्ध करण्यात आले आहे. संदीप हा 100 हून अधिक बळी आणि 10 हंगामाचा अनुभव असलेला या स्पर्धेतील सर्वात वरिष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)