Lahore: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू Mohammad Hafeez च्या घरी मोठी चोरी; परकीय चलनासह अनेक मौल्यवान वस्तूंवर मारला डल्ला

वृत्तानुसार, चोरट्यांनी हाफिजच्या घरातून 20,000 डॉलर्स, 5000 UAE दिरहाम, 4000 पाउंड आणि 3000 युरो पळवले.

Mohammad Hafeez (Photo Credit - Twitter)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज सध्या देशांतर्गत पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये खेळत आहे. पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूच्या लाहोर शहरातील घरात मंगळवारी चोरी झाल्याची बातमी अलीकडेच समोर आली आहे. हाफिजच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम, विदेशी चलन आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. वृत्तानुसार, चोरट्यांनी हाफिजच्या घरातून 20,000 डॉलर्स, 5000 UAE दिरहाम, 4000 पाउंड आणि 3000 युरो पळवले. चोरीच्या वेळी घरात कोणीही नव्हते. हाफिज पाकिस्तानी लीगमध्ये व्यस्त होता आणि त्याची पत्नी काही कामानिमित्त इस्लामाबादला गेली होती, त्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement