KKR vs LSG, IPL 2024 Live Score Update: लखनौने केकेआरला दिले 162 धावांचे लक्ष्य, पुरणची आक्रमक फलंदाजी
केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
KKR vs LSG, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या (IPL 2024) 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स लखनौ सुपरजायंट्सचा (KKR vs LSG) सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना लखनौने केकेआरसमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने 45 धावांची शानदार खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 162 धावा करायच्या आहेत.
Match 28. WICKET! 19.6: Arshad Khan 5(4) b Mitchell Starc, Lucknow Super Giants 161/7 https://t.co/ckcdJJSGdP #TATAIPL #IPL2024 #KKRvLSG
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

