LSG Beat PBKS, IPL 2024, Match 11: लखनौने पंजाबचा 21 धावांनी केला पराभव, गोलंदाजांनी जिंकवला सामना, धवन-बेअरस्टोची भागीदारी वाया

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 178 धावा करता आल्या.

LSG Beat PBKS, IPL 2024, Match 11: लखनौने पंजाबचा 21 धावांनी केला पराभव, गोलंदाजांनी जिंकवला सामना, धवन-बेअरस्टोची भागीदारी वाया

LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात लखनौने पंजाबचा 21 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 178 धावा करता आल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2024 11:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).