LSG Beat MI: लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग खडतर

मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर जोरदार पुनरागमन करत लखनौ सुपर जायंट्समोर 145 धावांचे ठेवले होते

Marcus Stoinis

मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर जोरदार पुनरागमन करत लखनौ सुपर जायंट्समोर 145 धावांचे ठेवले होते. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत लखनौची अवस्था 6 बाद 123 धावा अशी केली होती. मात्र निकोलस पुरनने संयमी खेळी करत 14 चेंडूवर 14 धावा करत लखनऊचा विजय सोप्पा केला. मार्कस स्टॉयनीसने 45 चेंडूत 62 धावा करत लखनऊच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबईकडून जसप्रित बुमराहने 4 षटकांत 17 धावां दिल्या तर कर्णधार हार्दिक पंड्याने लखनऊच्या दोन विकेट घेतल्या. या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement