Sachin Tendulkar च्या घरी भक्तिभावात गणपतीची प्रतिष्ठापना; मुलगा Arjun Tendulkar सोबत केली पूजा (Watch Video)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही गणेश चतुर्थीच्या उत्सवात उत्साहात सहभागी होताना दिसला.
आजपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्रासह देशभरात या उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलेब्जच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही गणेश चतुर्थीच्या उत्सवात उत्साहात सहभागी होताना दिसला. क्रिकेटरने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, तो मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत गणपतीची पूजा करताना दिसत आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरनेही इंस्टाग्रामवर ‘हॅपी गणेश चतुर्थी’ पोस्ट शेअर केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)