IND vs SL 1st ODI Live Score Update: कुलदीप यादवने भारताला मिळवून दिली चौथी विकेट, श्रीलकेंच्या कर्णधाराला दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs SL: चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत.

Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. याआधी भारताने तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत क्लीन स्वीप केला. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला संधी दिली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 91/4

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement