Kuldeep Yadav-Ravindra Jadeja Milestone: कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने रचला इतिहास; 'या' बाबतीत ठरले पहिले भारतीय गोलंदाज

वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

Kuldeep Yadav-Ravindra Jadeja

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा पहिला सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकांत केवळ 114 धावाच करू शकला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताविरुद्धची ही वेस्ट इंडिजची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 115 धावा करायच्या आहेत. या सामन्यादरम्यान कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या जोडीने अनोखा विक्रम नोंदवला. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा ही जोडी वनडेमध्ये 7 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी पहिली भारतीय डावखुरा फिरकी जोडी (Left-Arm Spinners) ठरली आहे. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4 बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. (हेही वाचा: IND vs WI 1st ODI 2023: विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या 'महारेकॉर्ड'ची बरोबरी करण्याची संधी, फक्त करावे लागेल 'हे' काम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now