KKR vs LSG Toss Update: कोलकाताने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
कोलकाता संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे, पण शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफच्या उरलेल्या आशा जिवंत ठेवू इच्छितो.
आज आयपीएलमधील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (KKR vs LSG) यांच्यात आहे. कोलकाता संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे, पण शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफच्या उरलेल्या आशा जिवंत ठेवू इच्छितो. त्याचबरोबर लखनौच्या संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायचे आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही सघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
बदली खेळाडू: काइल मेयर्स, यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, दीपक हुडा.
कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
बदली खेळाडू: सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकुल रॉय, एन जगदीसन, डेव्हिड विसे.
Match 68. Kolkata Knight Riders won the toss and elected to field. https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL #KKRvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

