SRH vs KKR, Live Score Update: रोमहर्षक सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी केला पराभव, शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी घातला बॉलने धुमाकूळ

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला आहे.

SRH vs KKR, Live Score Update: रोमहर्षक सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी केला पराभव, शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी घातला बॉलने धुमाकूळ

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 47 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून मार्को जॉन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 166 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून एडन मार्करामने सर्वाधिक 41 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 11:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).