KKR vs DC, IPL 2024 16th Match: आयपीएल 2024 चा 16 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक 85 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 17.2 षटकांत अवघ्या 166 धावा करून अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 55 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)