KL Rahul ने राष्ट्रगीतापूर्वी असे केले काही की चाहत्यांची जिंकली मने (Watch Video)

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला विजय नोंदवला.

KL Rahul (Photo Credit - Twitter)

भारताने झिम्बाब्वे दौऱ्याची दमदार विजयाने सुरुवात केली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यजमानांचा 10 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला विजय नोंदवला. याशिवाय भारतीय कर्णधारानेही आपल्या एका सुंदर हावभावाने चाहत्यांची मने जिंकली. सहसा, जेव्हा खेळाडू मैदानावर येतात तेव्हा त्यांच्या तोंडात च्युइंगम असते. राहुल मैदानात उतरला तेव्हाही तो च्युइंगम चघळत होता, पण क्षेत्ररक्षणापूर्वी सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी जमले तेव्हा राहुलने राष्ट्रगीताचा मान राखत तोंडातून च्युइंगम काढला. राहुलचा हा हावभाव चाहत्यांना खूप आवडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)