KL Rahul आणि पत्नी Athiya Sunil Shetty ने पाली हिलमध्ये घेतले आलीशान अपार्टमेंट, किंमत जाणून व्हाल थक्क

वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या संधू पॅलेस इमारतीच्या ग्राउंड-प्लस-18 मजल्यावरील दुसऱ्या मजल्यावर 3,350 चौरस फुटांची मालमत्ता आहे.

KL Rahul & Athiya Shetty (Photo Credit - X)

KL Rahul And Athiya Shetty New Apartment: टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Sunil Shetty) यांनी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल भागात 20 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. indextap.com ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांवरून हे उघड झाले आहे. वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या संधू पॅलेस इमारतीच्या ग्राउंड-प्लस-18 मजल्यावरील दुसऱ्या मजल्यावर 3,350 चौरस फुटांची मालमत्ता आहे. कागदपत्रांनुसार, ग्राउंड-प्लस-18 मजल्यावरील इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून आंशिक भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी 1.20 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. या अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंगच्या जागा आहेत. कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटची नोंदणी 15 जुलै रोजी झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)