KKR New Captain for IPL 2022: श्रेयस अय्यरच्या हाती कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान, लिलावात 12.25 कोटींचा मिळाला भाव
IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2022 साठी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. दोन वेळा आयपीएल चॅम्पियन फ्रँचायझीने लिलावात श्रेयसला 12 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले. श्रेयसपूर्वी पाच खेळाडूंनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. सौरव गांगुली KKR चा पहिला कर्णधार होता, तर गौतम गंभीर, ब्रेंडन मॅक्युलम, दिनेश कार्तिक आणि इयन मॉर्गन यांनी संघाची कमान सांभाळली होती.
IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएल 2022 साठी श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. दोन वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन फ्रँचायझीने लिलावात श्रेयसला 12 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले. श्रेयस 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. मुंबईकर फलंदाजाकडे यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार म्हणून अनुभव आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)