Kieron Pollard Retirement: मुंबई इंडियन्सचा ‘तात्या’ किरॉन पोलार्ड याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षात खेळले 224 सामने, एका ओव्हरमध्ये खेचले सहा ‘सिक्सर’
Kieron Pollard Retirement: वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या पोलार्डने कारकिर्दीत एकूण 224 सामने आणि 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा कारनामा करणारा तो दुसरा फलंदाज होता.
Kieron Pollard Retirement: वेस्ट इंडिजचा (West Indies) मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या पोलार्डने कारकिर्दीत एकूण 224 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 33 वर्षीय पोलार्डचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारी 2022 रोजी कोलकाता येथे भारताविरुद्ध (Team India) होता. पोलार्डने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. त्याने अकिला धनंजयच्या षटकात सलग सहा सिक्सर ठोकले होते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनंतर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड हा दुसरा फलंदाज होता.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 10:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

