IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: जसप्रीत बुमराहचा कहर, स्टीम स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का लागला आहे.

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: जसप्रीत बुमराहचा कहर, स्टीम स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
Team India (photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 19/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).