India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारतापासून दुबईपर्यंत आतषबाजी सुरू झाली आहे. 140 कोटी भारतीय चाहते आनंदात मग्न आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने किवी संघाने दिलेले 252 धावांचे लक्ष्य 6 विकेट्स गमावून पूर्ण केले. चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय संघाचा जल्लोष मैदानावरच सुरू झाला. चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून देणारा रवींद्र जडेजा हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगसोबत गंगनम डान्स करताना दिसला. त्याच वेळी, विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टंपसह दांडिया खेळताना दिसले.
One Team
One Dream
One Emotion!
🇮🇳🇮🇳🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/MbqZi9VGoG
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Harshit Rana trying to recreate 2013 moment. 😄❤️pic.twitter.com/y0ZSeJezty
— Aashutosh Goswami (@imAashutoshh) March 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)