Ishan Kishan Century: दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशनचे दमदार पुनरागमन, आपल्या स्फोटक शतकाने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

Ishan Kishan Century: दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर किशनला अचानक दुसऱ्या सामन्यात जागा मिळाली आणि त्याने ही संधी सोडली नाही. त्याने या स्पर्धेत इंडिया ब विरुद्ध इंडिया क संघाकडून दमदार शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Ishan Kishan (Photo Credit - X)

Duleep Trophy 2024-25: टीम इंडियातून बाहेर पडलेल्या इशान किशनने (Ishan Kishan) दमदार पुनरागमन करत दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy 2024-25) शानदार शतक झळकावले. दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर किशनला अचानक दुसऱ्या सामन्यात जागा मिळाली आणि त्याने ही संधी सोडली नाही. त्याने या स्पर्धेत इंडिया ब विरुद्ध इंडिया क संघाकडून दमदार शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. डावखुरा फलंदाज इशानने जवळपास 90 च्या स्ट्राईक रेटने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. किशनचा फॉर्म कायम राहिल्यास बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now