Ishan Kishan-Hardik Pandya Video: तेरे जैसा यार कहा! ईशान किशनने घेतली विश्वचषक हिरो हार्दिक पांड्याची गळाभेट, विजयाबद्दल केले अभिनंदन (Watch Video)

पांड्या भारतात परतल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने त्याची भेट घेऊन अभिनंदन केले. इशान किशनने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

Photo Credit - X

नुकताच भारतीय क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून मायदेशी परतला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पांड्या भारतात परतल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने(Ishan Kishan) त्याची भेट घेऊन अभिनंदन केले. इशान किशनने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये ईशान त्याचा सहकारी पांड्याच्या घरी अभिनंदन करण्यासाठी पोहोचला. पांड्या सोफ्यावर बसला आहे आणि इशान आत येताच त्याने त्याला मिठी मारली. यानंतर त्याने पांड्याच्या गालावर किस केले.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now