Ishan Kishan Century: ईशान किशनने वनडे कारकिर्दीतील झळकावले पहिले शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
इशान किशनने आपल्या वनडे कारकिर्दीतील नवव्या डावात प्रथमच शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने 85 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.
IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. मालिका गमावलेला भारतीय संघ या सामन्यात आपली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बांगलादेश क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशनने आपल्या वनडे कारकिर्दीतील नवव्या डावात प्रथमच शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने 85 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. रोहितच्या जागी आलेल्या किशनने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 15 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने 24 षटकात 162 धावा केल्या आहेत, तर भारताच्या नऊ विकेट शिल्लक आहेत.
💯
Maiden ODI CENTURY for @ishankishan51 and what a knock this has been from the youngster 👌👌
Live - https://t.co/HGnEqtZJsM #BANvIND pic.twitter.com/EYfVl1QfOc
— BCCI (@BCCI) December 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

