IPL 2025 Schedule: आयपीएल 2025 चे वेळापत्रक आज होणार जाहीर, नोट करुन घ्या टाईम

आयपीएल 2025 चे वेळापत्रक आज म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल. यावेळी सर्व संघांनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे.

IPL Trophy (Photo Credit - X)

IPL 2025 Schedule: आयपीएल 2025 (IPL 2025) 22 मार्चपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 22 मे रोजी होणार आहे. केवळ भारतातील चाहतेच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगची वाट पाहत आहेत. स्पर्धा सुरू होण्यास 2 महिन्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. पण आतापर्यंत आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पण आता वेळापत्रक कधी जाहीर होणार? त्याची नवीन तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. आयपीएल 2025 चे वेळापत्रक आज म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल. यावेळी सर्व संघांनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे. सर्व 10 संघ मोठ्या बदलांसह प्रवेश करणार आहेत. आगामी हंगामासाठी आतापर्यंत 8 संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत, तर दोन संघांचे कर्णधार जाहीर झालेले नाहीत. यामध्ये केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सची नावे आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now