IPL 2024 Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; 22 मार्चला होणार पहिला सामना
त्याच्या आणि आयपीएलच्या तारखांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरुवातीला केवळ 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
IPL 2024 Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी आयपीएलच्या चालू हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. सध्या केवळ 15 दिवसांच्या सामन्यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 5 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होईल. म्हणजेच एमएस धोनी विरुद्ध विराट कोहली यांच्या रूपाने या स्पर्धेची सुरुवात होईल. हा सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. या वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्या आणि आयपीएलच्या तारखांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरुवातीला केवळ 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी आयपीएलमध्ये अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळतील, ज्यामध्ये दोन नवीन संघांचा प्रवेश, युवा प्रतिभेची चमक आणि अनुभवी खेळाडूंची चमकदार कामगिरी यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Yashasvi Jaiswal Test Career: अवघ्या 22 व्या वर्षी यशस्वी जैस्वाल करू शकतो मोठा पराक्रम, 'या' बाबतीत विराट कोहलीला टाकेल मागे)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)