IPL 2024 Points Table: चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी केला पराभव, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

चेन्नईने हा सामना जिंकला आहे. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात केवळ 186 धावा करू शकला.

IPL 2024 Points Table: चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी केला पराभव, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

MI vs CSK: आयपीएल 2024 चा 29 वा (IPL 2024) रोमांचक सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने हा सामना जिंकला आहे. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात केवळ 186 धावा करू शकला आणि सीएसकेने 20 धावांनी सामना जिंकला. मुंबईसाठी रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली पण माजी कर्णधार संघाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी होऊ शकला नाही. रोहितने 12 वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. या सामन्यात रोहितने 105 धावा केल्या. चेन्नईच्या विजयानंतर सीएसकेने तिसऱ्या स्थानी पाईट टेबलमध्ये झेप घेतली आहे. तर, मुंबई आठव्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).