IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; Jasprit Bumrah पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या 16व्या सिझनमधून बाहेर

रिपोर्ट्सनुसार, बुमराहच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. सप्टेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता,

जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

आयपीएल 2023 सुरू व्हायला एक महिन्याहून अधिक कालावधी बाकी आहे. याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीवर ताण आल्याची तक्रार होती. याच कारणामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह गेल्या पाच महिन्यांपासून संघाबाहेर आहे. रिपोर्ट्सनुसार, बुमराहच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. सप्टेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता, तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तेव्हापासून बुमराह आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 ला मुकला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now