IPL 2022: फाफ डु प्लेसिस RCB चा नवीन कर्णधार बनल्यानंतर Virat Kohli याची पहिली प्रतिक्रिया, पहा काय म्हणाला माजी कर्णधार (Watch Video)

RCB New Captain: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल 2021 मध्ये विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिस याची नवा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. आरसीबीने माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आगामी हंगामासाठी खूप उत्सुक दिसत आहे आणि फॅफला त्याच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

IPL 2022: फाफ डु प्लेसिस RCB चा नवीन कर्णधार बनल्यानंतर Virat Kohli याची पहिली प्रतिक्रिया, पहा काय म्हणाला माजी कर्णधार (Watch Video)
विराट कोहली (Photo Credit: PTI)

RCB New Captain: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएल 2021 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याची नवा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. फॅफला कर्णधार बनवल्यानंतर विराट कोहलीने त्याला आगामी मोसमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट 2011 ते 2021 पर्यंत संघाचा कर्णधार होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).