IPL 2022, SRH vs PBKS: हरप्रीत ब्रारच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज हतबल, पंजाब किंग्ससमोर 158 धावांचे टार्गेट

IPL 2022, SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 8 बाद 157 धावसंख्या उभारली आणि पंजाब किंग्ससमोर 158 धावांचे आव्हान ठेवले आहे. एकीकदार हरप्रीत ब्रारच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे धुरंधर फलंदाज हतबल दिसले तर, मोक्याच्या क्षणी रोमारियो शेफर्ड आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. अभिषेक शर्माने 43 धावांची खेळी केली.

IPL 2022, SRH vs PBKS: हरप्रीत ब्रारच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज हतबल, पंजाब किंग्ससमोर 158 धावांचे टार्गेट
हरप्रीत ब्रार (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 157 धावसंख्या उभारली आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) समोर 158 धावांचे आव्हान ठेवले आहे. एकीकदार हरप्रीत ब्रारच्या (Harpreet Brar) भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे धुरंधर फलंदाज हतबल दिसले तर, मोक्याच्या क्षणी रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. शेफर्ड धावा करून नाबाद राहिला, तर सुंदरने 21 धावा केल्या. तसेच अभिषेक शर्माने 43 धावांची खेळी केली. दुसरीकडे, हरप्रीत आणि नॅथन एलिस पंजाबचे यशस्वी गोलंदाज ठरले, त्यांनी तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय कगिसो रबाडाने 1 गडी बाद केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2022 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).