IPL 2022, SRH vs KKR Match 25: नितीश राणाचा अर्धशतकी तडाखा, आंद्रे रसेलचा ‘पॉवरफुल’ शो; कोलकात्याच्या हैदराबादपुढे 176 धावांचे आव्हान
IPL 2022, SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 25 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीने बलाढ्य कोलकाता संघाने निर्धारित षटकांत 8 बाद 175 धावांवर रोखले. केकेआरकडून नितीश राणा (Nitish Rana) ने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) फटकेबाजीने संघाला आव्हानात्मक संख्येपर्यंत नेले.
IPL 2022, SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 25 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीने बलाढ्य कोलकाता संघाने निर्धारित षटकांत 8 बाद 175 धावांवर रोखले. अशाप्रकारे सनरायझर्स संघाला विजयासाठी 176 धावांचे आव्हान मिळाले आहे. केकेआरकडून नितीश राणा (Nitish Rana) ने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) फटकेबाजीने संघाला आव्हानात्मक संख्येपर्यंत नेले. रसेल 25 चेंडूत 49 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, हैदराबादसाठी नटराजनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच उमरान मलिकने दोन आणि मार्को जॅन्सन, जगदीशा सुचित व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक गाडी बाद केला.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

