IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थानने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; गुजरातकडून Yash Dayal चे पदार्पण, RR मधेही एक बदल
IPL 2022, RR vs GT: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा 24 वा सामना आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या मॅचसाठी गुजरातकडून यश दयालने पदार्पण केले आहे. तर राजस्थान प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करून मैदानात उतरणार आहे.
IPL 2022, RR vs GT: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात आयपीएलचा (IPL) 24 वा सामना आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju SAmson) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात संघ पहिले फलंदाजीला उतरणार आहे. आजच्या मॅचसाठी गुजरातकडून यश दयालने (Yash Dayal) पदार्पण केले असून प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण दोन बदल झाले आहेत. तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्टच्या जागी जेम्स नीशमचा (Jimmy Neesham) समावेश झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)