IPL 2022: राशिद खान याची मोठी कामगिरी; सर्वात जलद 100 आयपीएल विकेट घेणारा दुसरा फिरकीपटू, भारतीय दिग्गजच्या विक्रमाशी साधली बरोबरी

IPL मध्ये 100 बळी घेणारा तो दुसरा वेगवान फिरकी गोलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या सर्वात कमी सामन्यात हा कारनामा करणारा राशिद तिसरा गोलंदाज आहे. राशिदसह भारतीय दिग्गज अमित मिश्राने 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

राशिद खान (Photo Credit: Twitter/IPL)

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेंकटेश अय्यरची पहिली विकेट घेत एका खास विक्रमात आपले नाव नोंदवले आहे. आयपीएलमध्ये 100 बळी (IPL 100 Wickets) घेणारा तो दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 आयपीएल विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या 70 सामन्यांमध्ये हा कारनाम केला होता. तर भुवनेश्वर कुमार 82 सामन्यात हा टप्पा गाठला होता. तर अमित मिश्रा (Amit Mishra), आशिष नेहरा आणि आता रशीद खान हे संयुक्तपणे तीन गोलंदाज यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तिघांनीही 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)