IPL 2022, PBKS vs RR Match 52: पंजाब किंग्सला पहिला धक्का, शिखर धवन स्वस्तात आऊट; जोस बटलरने हवेत उडी मारून घेतला अप्रतिम कॅच
IPL 2022, PBKS vs RR Match 52: राजस्थान रॉयल्सचा ऑरेंज कॅप धारक जोस बटलरने हवेत सूर मारून शिखर धवनचा अप्रतिम एकहाती कॅच घेतला आणि पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर धवनने हवेत हलक्या हाताने शॉट खेळला पण बटलरने हवेत उडी घेत धवनचा झेल पकडून 12 धावांवर पंजाबच्या सलामी फलंदाजाला पॅव्हिलियनची वाट दाखवली.
IPL 2022, PBKS vs RR Match 52: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ऑरेंज कॅप धारक जोस बटलरने (Jos Buttler) हवेत सूर मारून शिखर धवनचा (Shikhar Dhawan) अप्रतिम एकहाती कॅच घेतला आणि पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला. राजस्थान रॉयल्ससाठी पहिली विकेट आर अश्विनने मिळवली, ज्याने 12 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर धवनला बटलरकरवी झेलबाद केले. धवनने 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या.
Match 52. WICKET! 5.1: Shikhar Dhawan 12(16) ct Jos Buttler b Ravichandran Ashwin, Punjab Kings 47/1 https://t.co/Oj5tAfX0LP #PBKSvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

