IPL 2022, PBKS vs RCB Match 3: फाफ डु प्लेसिस याची झंझावाती फलंदाजी, दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी; पंजाब विरुद्ध बेंगलोरचा 205 धावांचा डोंगर

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्या धावांची झंझावती खेळी आणि दिनेश कार्तिक याच्या अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकांत 2 विकेट गमावून 205 धावांचा डोंगर उभारला आहे. कोहलीने नाबाद 41, तर फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 88 आणि कार्तिकने 14 चेंडूत 32 धावांची आक्रमक फलंदाजी केली.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्या धावांची झंझावती खेळी आणि दिनेश कार्तिक याच्या अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकांत 2 विकेट गमावून 205 धावांचा डोंगर उभारला आणि पंजाब किंग्सपुढे विजयासाठी 206 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. कोहलीने नाबाद 41, तर फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 88 आणि कार्तिकने 14 चेंडूत 32 धावांची आक्रमक फलंदाजी केली. दुसरीकडे, पंजाब किंग्सचे गोलंदाज संपूर्ण सामन्यात आरसीबी फलंदाजांच्या वादळी खेळीपुढे धराशायी झाली.