IPL 2022: मुंबई इंडियन्सची नवीन भरती Dewald Brevis याचा नेट्समध्ये कसून सराव, पदार्पणाच्या आयपीएलसाठी करतोय जोरदार तयारी, पहा व्हिडिओ
IPL 2022: नुकत्याच संपन्न झालेल्या अंडर-19 विश्वचषक 2022 चा सामनावीर ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू Dewald Brevis याला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 5 वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपयांना खरेदी केले. ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध ब्रेविसचे पहिले फलंदाजी सत्र क्रिकेट चाहत्यांसाठी आनंददायी ठरले.
IPL 2022: गेल्या काही दिवसांपासून आयपीएल फ्रँचायझी सोशल मीडियावर मुंबईत क्वारंटाईन पूर्ण करणाऱ्या आणि नेट सेशनमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचे व्हिडिओ शेअर करत आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indias) देखील दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याच्या पहिल्या फलंदाजी सत्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. ब्रेविसच्या अंडर- विश्वचषकात शानदार प्रदर्शनाने अनेक आयपीएल (IPL) फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले, ज्यात 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने बाजी मारली. मुंबई 2022 मेगा लिलावात 3 कोटी रुपयांत ब्रेविसला खरेदी केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)