IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचे गुजरातसमोर 178 धावांचे आव्हान, रोहित-ईशानच्या कडक सुरुवातीनंतर Tim David ची तुफान फटकेबाजी

IPL 2022, MI vs GT: आयपीएलच्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आणि गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनच्या सलामी जोडीच्या शानदार सुरुवातीनंतर टिम डेविडच्या छोटेखानी योगदानने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. टिम डेविड 44 धावा करून नाबाद राहिला.

IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचे गुजरातसमोर 178 धावांचे आव्हान, रोहित-ईशानच्या कडक सुरुवातीनंतर Tim David ची तुफान फटकेबाजी
टिम डेविड (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs GT: आयपीएलच्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) समोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) सलामी जोडीच्या शानदार सुरुवातीनंतर टिम डेविडच्या (Tim David) छोटेखानी योगदानने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. टिम डेविड 44 धावा करून नाबाद राहिला तर, किशनने 45 आणि रोहितने 43 धावांची खेळी केली. दुसरीकडे, राशिद खान (Rashid Khan) दोन विकेट घेत गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन आणि प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2022 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).