IPL 2022, LSG vs CSK Match 7: एमएस धोनी याची झटपट फलंदाजी, आयपीएलमध्ये अशी करामात करणारा सहावा भारतीय तर बनला पहिला विकेटकीपर
चेन्नई सुपर किंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज MS Dhoni याने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावली आणि इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी आपल्या नावे केली. चेन्नईचा माजी कर्णधार धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक तर देशाचा एकूण सहावा फलंदाज ठरला आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. धोनी टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा सहावा भारतीय बनला. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा हे T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारे इतर पाच भारतीय फलंदाज आहेत. धोनीने आता 349 टी-20 सामन्यांमध्ये 7000 हून अधिक धावा केल्या आहेत.
MS Dhoni - 7001 runs in T20 cricket!
Runs for...
4687* - Chennai Super Kings #CSK
1617 - India
574 - Rising Pune Supergiants
123 - Jharkhand#CSKvLSG#IPL2022#IPL#WhistlePodu
— Mohandas Menon (@mohanstatsman) March 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 09:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

