Ahmedabad IPL 2022 Team: अहमदाबाद संघाचे अधिकृत नाव जाहीर, जाणून घ्या कोणत्या नावाने ओळखली जाणार ही फ्रेंचायझी

Ahmedabad IPL 2022 Team: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपवून अहमदाबादस्थित इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीने अखेर त्यांचे नाव जाहीर केले आहे. सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील नवीन संघाला गुजरात टायटन्स म्हटले जाईल. CVC समुहाने तब्बल 5625 कोटी रुपयात फ्रँचायझी खरेदी केली.

Ahmedabad IPL 2022 Team: अहमदाबाद संघाचे अधिकृत नाव जाहीर, जाणून घ्या कोणत्या नावाने ओळखली जाणार ही फ्रेंचायझी
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

Ahmedabad IPL 2022 Team: आयपीएलच्या (IPL) 2022 सीजनपासून टी-20 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझी सामील होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी Star Sports वर आता अखेरीस अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ‘गुजरात टायटन्स’ (Gujarat Titans) हे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील अहमदाबाद फ्रँचायझीचे (Ahmedabad Franchise) अधिकृत नाव आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).