IPL 2022: गुजरात टायटन्सचा Jason Roy याचा भावनिक संदेश, आयपीएलमध्ये का सहभागी होणार नसल्याचे कारण केले स्पष्ट

गुजरात टायटन्सचा सलामीवीर जेसन रॉयने IPL मधून आपले नाव मागे घेतले आहे. गुजरात टायटन्स प्रथमच आयपीएल खेळणार आहे, मात्र त्यापूर्वी संघाला धक्का बसला आहे. रॉय याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला वाटते की हीच योग्य वेळ आहे जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे. इंग्लंड फलंदाजाने लिहिले की मी माझ्या निर्णयाचा आदर करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो.

जेसन रॉय (Photo Credit: Instagram)

Jason Roy Pulls Out of IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 पूर्वी गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याने यावेळच्या आयपीएलमध्ये (IPL) न खेळण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघासाठी हा पहिलाच मोसम असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. रॉयने आता एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने आयपीएलमध्ये भाग न घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now