IPL 2022, DC vs PBKS Match 32: अरेरे! दिल्लीच्या दुसऱ्या परदेशी खेळाडूची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह, पंजाबविरुद्ध सामन्यावर टांगती तलवार - Report

IPL 2022, DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएलचा 32 व्या सामन्यापूर्वी ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या कॅम्पमधील दुसऱ्या परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. यापूर्वी दिल्लीच्या टीममध्ये कोरोनाचे एकूण पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, कोरोनाबाधित मिचेल मार्शला सोमवारी रुग्णालयात दाखल करावे लागले.

IPL 2022, DC vs PBKS Match 32: अरेरे! दिल्लीच्या दुसऱ्या परदेशी खेळाडूची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह, पंजाबविरुद्ध सामन्यावर टांगती तलवार - Report
अक्षर पटेल - ललित यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 32 वा सामना पुणे येथून मुंबईत हलवण्यात आला आहे. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधील दुसऱ्या परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, यामुळे आज संध्याकाळी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).