IPL 2022, DC vs MI Match 2: कुलदीप यादव याच्या फिरकीची जादू चालली; ईशान किशन याचा ‘वन मॅन शो’, मुंबईचे दिल्लीसमोर 178 धावांचे आव्हान

IPL 2022, DC vs MI Match 2: आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने निर्धारित षटकांत 177/5 धावांचा डोंगर उभारला आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी ईशान किशन याने 81 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे, दिल्लीसाठी कुलदीप यादव याच्या फिरकीने कमाल केली. कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs MI Match 2: आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित षटकांत 177/5 धावांचा डोंगर उभारला आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी ईशान किशन (Ishan Kishan) याने 81 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. ईशानने आपल्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार खेचले.तसेच कर्णधार रोहित शर्मा याने 41 आणि तिलक वर्मा याने 22 धावांची खेळी केली. दुसरीकडे, दिल्लीसाठी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या फिरकीने कमाल केली. कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर 47 धावा देऊन सर्वात महागडा ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement