IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर Prithvi Shaw रुग्णालयात, सोशल मीडियावर फोटोद्वारे शेअर केली माहिती
IPL 2022, CSK vs DC Match 55: दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाचे कारण मात्र कळू शकलेले नसून आज दिवसाच्या सुरुवातीला फ्रँचायझीच्या एका नेट गोलंदाजाची COVID-19 चाचणी सकारात्मक आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे.
IPL 2022 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 8 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार नाही. दिल्लीचा फलंदाज पृथ्वीला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापासून खूप ताप आला होता, त्यामुळे तो शेवटचा सामना खेळू शकला नाही. आणि आज सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने लवकरच तापातून बरा होऊन मैदानात परतणार असल्याची माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)