IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्जला पहिले फलंदाजीची दिली संधी

या हाय व्होल्टेज सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे.

RR Vs CSK (Photo Credit: File Photo)

आयपीएल (IPL) 2021 च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.