IPL 2021: जोश हेझलवूडच्या जागी CSK ताफ्यात ‘या’ वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा समावेश

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार आहे. बेहरेनडोर्फला त्याच्याच देशातील जोश हेजलवुडच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएल आयोजकांनी निवेदन जारी करून याविषयी माहिती दिली.

CSK (Photo Credit: IPL)

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ (Jason Behrendorff) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघात सामील होणार आहे. बेहरेनडोर्फला त्याच्याच देशातील जोश हेजलवुडच्या (Josh Hazlewood) जागी संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएल आयोजकांनी निवेदन जारी करून याविषयी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी हेझलवुडने या स्पर्धेतून माघार घेतली होती. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नईचा संघ आयपीएल 2021 मोहिमेची सुरुवात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्ध सामन्याने करेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement