IPL 2021 खेळलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मालदीवसाठी रवाना, माईक हसी CSK च्या देखरेखीत; CA ने केली पुष्टी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत निवेदन देत पुष्टी केली.

माईक हसी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये भाग घेणारे सर्व ऑस्ट्रेलियन, कोरोना विषाणूची लागण झालेल्या माईक हसी (Mike Hussey) वगळता, गुरुवारी मालदीवला आपल्या देशात जाण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी रवाना झाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत निवेदन देत पुष्टी केली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने एका ट्वीट पोस्टमध्ये म्हटले की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक, सामना अधिकारी आणि कमेंटेटर सुरक्षितपणे भारतातून रवाना झाले आहेत आणि मालदीवला जात आहेत याची आम्ही पुष्टी करू शकतो.” माइकची सौम्य लक्षणे असून तो आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या देखरेखीखाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)