IPL 2021: पंजाब किंग्सच्या दीपक हुड्डाने केले भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन? RR विरुद्ध मॅचपूर्वी केली होती ‘ही’ चूक
बीसीसीआय-एसीयू दीपकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या मॅच-डे सोशल मीडिया पोस्टची चौकशी करेल. हुड्डाने 21 सप्टेंबर 2021 रोजी दुबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचे हेल्मेट परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला होता.
IPL 2021: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) बीसीसीआय भ्रष्टाचारविरोधी युनिट (BCCI-ACU) स्कॅनरखाली आला आहे. बीसीसीआय-एसीयू दीपकने इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर केलेल्या मॅच-डे सोशल मीडिया पोस्टची चौकशी करेल आणि भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले की नाही ते तपासेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)