INDvsENG: 'नाण्याला दोन बाजू असतात...'; भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkar ने दिली प्रतिक्रिया (See Tweet)
सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता 13 नोव्हेंबरला त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताने ठेवलेले 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 4 षटके बाकी असताना एकही बिनबाद 170 धावा केल्या. भारताचा आज झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे. अशात महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर याने आजच्या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणतो, 'नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जीवनालाही. जर आपण आपल्या संघाचे यश आपले यश असल्यासारखे साजरे केले, तर आपण आपल्या संघाचे नुकसानही सहन करू शकलो पाहिजे. आयुष्यात दोघेही हातात हात घालून चालतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)