Shubman Gill Retired Hurt: भारताचा ताण वाढला, क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिलने मैदान सोडले; श्रेयस अय्यर आला फलंदाजीला

सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

Shubman Gill Retired Hurt: भारताचा ताण वाढला, क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिलने मैदान सोडले; श्रेयस अय्यर आला फलंदाजीला

IND vs NZ ICC World Cup 2023 Semi Final: विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. या दरम्यान क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिलने मैदान सोडले त्याच्या जागी श्रेयस अय्यर मैदानावर आला. भारताचा स्कोर 178/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).